पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यास महिलेने घेतला चावा

पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यास महिलेने घेतला चावा
Published on

पोलिस अधिकाऱ्यास
महिलेचा चावा

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) ः भिवंडीतील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकास एका महिलेने हाताला चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेण्याच्या गोंधळादरम्यान ही घटना घडली.
शांतीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) सायंकाळी सईद खान व त्याचे कुटुंबीय जब्बो सईद खान, मौसीम खान व सिमरन खान हे तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्या वेळी या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत आरडाओरड सुरू केली. त्या वेळी सईद खान हा त्याचे डोके पोलिस ठाणे आवारातील खांबावर आपटून दुखापत करून घेत होता. त्या वेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण घोलप त्यास थांबवण्यास गेले असता त्याच्या मुलीने घोलप यांच्या डाव्या हाताला चावा घेत दुखापत केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या चौघांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com