टँकर मधून ऍसिड गळती

टँकर मधून ऍसिड गळती
Published on

टँकरमधून ॲसिडगळती
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : काशी मिरा येथील लक्ष्मी बाग परिसरात शुक्रवारी (ता. १०) दुपारी एका टँकरमधून मोठ्या प्रमाणात ॲसिडची गळती झाली. या वेळी ॲसिडचा धूर सर्वत्र पसरून अनेकांना श्वास घेण्याचा त्रास झाला. मात्र, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

लक्ष्मीबाग परिसरातील एका कारखान्यात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरमधून दुपारी दीडच्या सुमारास अचानक गळती सुरू झाली. या वेळी ॲसिड सर्वत्र पसरून मोठा धूर निर्माण झाला व परिसरातील अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या वेळी कारखान्यात १० कामगार होते. बाहेर सर्वत्र ॲसिड असल्याने ते बाहेर पडू शकत नव्हते. मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी धाव घेत ॲसिडवर माती पसरवली व कामगारांची सुटका केली.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com