

गुंतवणुकीच्या बहाण्याने
२५ लाख उकळले
गॅस एजन्सी मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : भागीदारी आणि गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवत एका गॅस एजन्सीच्या मालकाने फळ व्यापाऱ्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनील रामभाऊ गुंजाळ (६२) असे या गॅस एजन्सी मालकाचे नाव असून, नेरूळ पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुनील गुंजाळ हा कोपरखैरणेत राहण्यास असून त्याची त्याच भागात विघ्नहर गॅस सर्व्हिस नावाची एजन्सी आहे. या प्रकरणातील तक्रारदार भालचंद्र नलावडे (६७) हे नेरूळमध्ये राहण्यास असून, ते फळ व्यापारी आहेत. सुनील गुंजाळ आणि नलावडे हे व्यवसायाच्या निमित्ताने एकमेकांना अनेक वर्षांपासून चांगले ओळखतात. याच ओळखीतून सुनील गुंजाळ याने २०२०मध्ये त्याची गॅस एजन्सी भारत पेट्रोलियमशी (बीपीसीएल) संबंधित असल्याचे सांगून त्यात नलावडे यांना भागीदार करण्याचे प्रलोभन दाखवले.
गुंजाळ याने नलावडे यांना व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तसेच या गुंतवणुकीच्या बदल्यात दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले. या आश्वासनाला बळी पडून नलावडे यांनी तब्बल २५ लाख रुपये गुंजाळ याला दिले. मात्र दीर्घकाळ उलटूनही नलावडे यांना हा परतावा मिळाला नाही. त्यामुळे नलावडे यांनी गुंजाळकडे आपल्या मूळ रकमेची मागणी केली, पण गुंजाळ याने वेगवेगळी कारणे सांगितली. याप्रकरणी नलावडे यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुनील गुंजाळविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.