

झोपड्यांच्या आगीत तिघांचा जळून मृत्यू
भाईंदरमध्ये सिलिंडरचे स्फोट
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : पूर्वेतील इंद्रलोक परिसरात मोकळ्या जागांवर बांधण्यात आलेल्या झोपड्यांना शुक्रवारी (ता. १०) रात्री ८च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात तिघांचा जळून मृत्यू झाला. अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या, तसेच गॅस सिलिंडरचे स्फोट झाले.
इंद्रलोक फेज चारमध्ये कांदळवनालगतच पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांना रात्री आग लागली. आगीचे स्वरूप भीषण होते. या वेळी अनेक गॅस सिलिंडरचे स्फोटही झाले. रात्री उशिरा आगीत जळलेले तीन मृतदेह आढळून आले; मात्र त्यांची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या वेळी २५हून अधिक गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली की आगीमुळे सिलिंडरचे स्फोट झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, झोपड्यांमध्ये सिलिंडर कसे आले यावर आश्चर्य व्यक्त होत असून, येथे अनधिकृत गोदाम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी जाण्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. कांदळवनालगत एवढ्या झोपड्या बांधण्यात आल्या असतानाही त्यावर कारवाई का झाली नाही, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
...
गोदामालाही आग
काशी मिरा भागातही माशाचा पाडा येथे रात्री ९च्या सुमारास एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने अग्निशमन विभागाची मात्र चांगलीच धावपळ उडाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.