

नव्या संहितेमुळे कामगार हक्काचे बळकटीकरण
मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ सोहळा जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे शनिवारी (ता. ११) आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यातील सुरक्षा व आरोग्यविषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल धोकादायक तसेच धोकादायक नसलेल्या उद्योगांचा गौरव करण्यात आला. या वेळी विविध श्रेणींमध्ये एकूण २४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी नवीन कामगार संहितेमुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमास कामगारमंत्री आकाश फुंडकर, विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, संचालक (बाष्पके) तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १,६०० कारखाना प्रतिनिधींनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. या वेळी आकाश फुंडकर यांनी सांगितले, की केंद्र शासनाने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. तर आय. ए. कुंदन यांनी, नवीन कामगार संहितांमुळे कामगारांना अधिक सुरक्षितता, आरोग्यदायी कामाचे वातावरण आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील, तसेच उद्योगांना प्रक्रियेत सुलभता आणि स्पष्टता प्राप्त होईल, असे नमूद केले.
नवी मुंबईत आज मॅरेथॉन
औद्योगिक सुरक्षा व आरोग्यविषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता २०२०’ या विषयावर प्रशिक्षण सत्रही पार पडले. औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर मॅरेथॉनचेही आजोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.