

ठाणे रेल्वे स्थानकावर
प्रवाशाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) समोर आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित आप्पा पिरनकर (४७) हे बुधवारी रात्री कामावरून घरी परतत होते. ते परळ स्थानकावरून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने ठाण्याकडे निघाले होते. रात्री सुमारे १०.३० वाजता ठाणे स्थानकावर उतरत असताना गर्दीत दोन अनोळखी प्रवाशांसोबत त्यांचा धक्का लागून वाद झाला. या वादातून संबंधितांनी पिरनकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या उजव्या डोळ्यावर जोरात चापट मारल्याने गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. जखमी अवस्थेमुळे पिरनकर यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वॉर्डमध्ये दाखल केले असून, डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, साहबलाल बाबूराम चौहान (४४) व सुमीत चौहान (२३) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.