ठाण्याच्या टिकुजीनीवाडीतील २६ वृक्षांची बेकायदा तोड; ठेकेदार व विकासकांविरोधात गुन्हा

ठाण्याच्या टिकुजीनीवाडीतील २६ वृक्षांची बेकायदा तोड; ठेकेदार व विकासकांविरोधात गुन्हा
Published on

ठाण्यात २६ वृक्षांची बेकायदा तोड
टिकुजिनीवाडीतील ठेकेदार व विकसकांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : टिकुजिनीवाडी येथे महादेव मंदिराजवळील भूखंडावर २६ वृक्षांची बेकायदा तोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने संबंधित ठेकेदार व विकसकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठामपा उद्यान निरीक्षक डॉ. राहुल दुरगुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (ता. ८) वृक्षतोडीबाबत माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी (ता. ९) पुन्हा तपासणी केली असता त्या भूखंडावरील विविध प्रकारचे २६ वृक्ष तोडल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी जेसीबी ठेकेदार विशाल कदम तसेच भूखंड मालक/विकसक अविनाश तांगडी व कपील शर्मा यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com