

अंबरनाथमध्ये तरुणीची आत्महत्या
अंबरनाथ ता. ११ (वार्ताहर) ः अंबरनाथ येथील २६ वर्षीय तरुणीने एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय तरुणी एका खासगी कन्सल्टन्सी कंपनीत लेखापाल या पदावर कार्यरत होती. घटनेच्या दिवशी या कंपनीच्या मालकाने तिला ‘एस थ्री पार्क’ या हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले होते. दरम्यान, हॉटेलवरून कंपनीचा मालक काही कामासाठी बाहेर गेला. त्या वेळी तरुणीने वारंवार त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यास मालकाचा प्रतिसाद न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कंपनीचा मालक हॉटेलवर परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने आत प्रवेश केला असता, तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
कंपनी मालक आणि इतर काही संशयितांची या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. हॉटेल रूमचे बुकिंग कंपनीच्या नावाने असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या मृत्यूबाबत कुटुंबीय आणि स्थानिक स्तरावर संशय व्यक्त केला जात असून, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
संबंधित तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे; मात्र तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, यादृष्टीने तांत्रिक बाबी आणि साक्षीदारांची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.