आज कला शिक्षण सीईटी प्रवेश परीक्षा

आज कला शिक्षण सीईटी प्रवेश परीक्षा
Published on

आज कला शिक्षण सीईटी प्रवेश परीक्षा
- राज्यात २,८७२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
मुंबई, ता. ११ ः राज्य सीईटीकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एएसी-कला शिक्षणमध्ये रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा रविवारी (ता. १२) घेण्यात येत आहे.
राज्यात एएसी-कला शिक्षणासाठीची परीक्षा २४ केंद्रांवर होणार असून, या परीक्षेला २,८७२ विद्यार्थी बसणार आहेत. यंदा या सीईटीसाठी २,८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात आठ अनाथ विद्यार्थी आणि २८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी एएसी-कला शिक्षण सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी २,७८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. ही सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील २४ परीक्षा केंद्रांवर होत आहे.

एमएचटी पीसीएम सीईटीला ९५.९२ टक्के उपस्थिती
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूहासाठीची सीईटी प्रवेश परीक्षा शुक्रवारी सुरू झाल्या आहेत. दोन्ही सत्रांत मिळून राज्यात ५९,७२४ विद्यार्थ्यांपैकी ५७,२९० विद्यार्थ्यांची म्हणजेच ९५.९२ टक्के उपस्थिती होती. या पीसीएम सीईटीमध्ये राज्यात आज एकूण २,४३४ विद्यार्थी अनुपस्थित होते. आज झालेल्या दोन्ही सत्रांतील परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील २०१ परीक्षा केंद्रांवर ही सीईटी परीक्षा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com