

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : उरण पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री आणि त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) दुपारी जासई येथील एका पार्किंग परिसरामध्ये छापा टाकून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या एकूण तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ५२ हजार ८०० रुपयांचे गर्द (हेरॉईन)सदृश अमली पदार्थ जप्त केले आहे.
जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळीच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे उरण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी त्या ठिकाणी धाड टाकली. रवींद्र कल्याण शेट्टी (वय २७), गणेश दत्तू भिडे (२५) आणि गणेश विनय पाटील (१९) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गणेशकडे ६.३२ ग्रॅमची गर्दसदृश फिक्कट तपकिरी रंगाच्या पावडरच्या ८५ पुड्या सापडल्या. या कारवाईत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली. न्यायालयाने या तिन्ही संशयितांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.