बुलेट ट्रेन कामगारांची आमदार विनोद निकोले यांच्याकडे धाव

बुलेट ट्रेन कामगारांची आमदार विनोद निकोले यांच्याकडे धाव
Published on

बुलेट ट्रेन कामगारांची आमदारांकडे धाव
कमी वेतन व वाढीव कामाच्या तासांबाबत तक्रार

कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पावर कार्यरत असलेल्या कामगारांनी शुक्रवारी (ता. ११) आमदार विनोद निकोले यांच्याकडे आपले प्रश्न मांडले. कमी वेतन, आठ तासांच्या ऐवजी १२ तास काम करवून घेत असल्याची माहिती या वेळी कामगारांनी आमदारांना दिली.

कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यल्प पगारात जादा वेळ काम करून घेतले जात असून, यामुळे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली. या वेळी आमदार विनोद निकोले यांनी कामगारांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ चर्चा केली. कामगारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, तसेच त्यांच्या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीस लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीचे अधिकारी सक्सेना उपस्थित होते. तसेच नंदकुमार हडळ, संतोष खटाल, नरेश शिंगडा, विजय बोदले यासह इतर पदाधिकारी व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कामगारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पातील कामगारांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, संबंधित प्रशासन व कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com