

भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतक जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे समाजात रुजवणे आणि ते आत्मसात करण्याची खरी गरज आहे. आपण समाज म्हणून हे कार्य कितपत करतो, याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावे, असे प्रतिपादन कवयित्री व लेखिका सुरेख पैठणे यांनी केले.
भिवंडी महापालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त महात्मा फुले जयंतीदिनी पालिका मुख्यालयात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. या वेळी उपमहापौर तारिक मोमिन, उपायुक्त विक्रम दराडे, नगरसेवक फराज बहुउद्दीन, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती’चे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक विकास निकम, समाजकल्याण विभाग प्रमुख मिलिंद पळसुळे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणात सुरेख पैठणे यांनी, महात्मा फुले आणि कार्ल मार्क्स हे समकालीन होते. मार्क्स यांनी युरोपात आर्थिक क्रांती घडवून आणली, तर फुले यांनी सामाजिक समतेची चळवळ उभी करत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे असावे हा प्रगत विचार त्यांनी त्या काळात मांडला, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमहापौर तारिक मोमिन व उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे यांनी केले, तर आभार जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.