अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘वर्तक वर्तमान’ प्रकाशन

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘वर्तक वर्तमान’ प्रकाशन
Published on

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘वर्तक वर्तमान’ त्रैमासिकाचे प्रकाशन

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त ‘वर्तक वर्तमान’ या त्रैमासिक वार्तापत्राचा (जानेवारी-मार्च २०२६) पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.

या कार्यक्रमात वार्तापत्राचे संपादक प्रा. शैलेश औटी यांनी महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यावर व्याख्यान देत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच मानवकेंद्री दृष्टिकोन बाळगून अभ्यास करावा, असे मार्गदर्शन केले. यानंतर लेखा विभाग आणि महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘रिसर्च मेथडोलॉजी ॲण्ड डेटा ॲनालिसिस युझिंग एसपीएसएस’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी डॉ. राजन नांदोला हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या कार्यशाळेचे उद्‍घाटन आणि वार्तापत्राच्या प्रकाशन समारंभासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल कुमार शेळके, उपप्राचार्य डॉ. दीपा मुर्डेश्वर कत्रे आणि अंतर्गत दर्जा आम्ही कक्षाच्या समन्वयक डॉ. हिरानंद खंबायत, पदव्युत्तर विभागाच्या समन्वयक प्रा. नारायणन, महाविद्यालयाचे प्रबंधक दिलीप वर्तक यांच्यासह महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यशाळेत ७५ विद्यार्थी आणि ४१ शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना संशोधन लेखनाची मूलतत्त्वे, संशोधन निबंधाची रचना तसेच एक्सेल व एसपीएसएसच्या सहाय्याने विदा (डेटा) विश्लेषणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. टी-टेस्ट, कॉरलेशन, रिग्रेशन ॲनालिसेस यासारख्या संकल्पना विद्यार्थ्यांना आत्मसात करता आल्या.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होऊन सांख्यिकी साधनांच्या वापराबाबत आत्मविश्वास वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com