

पालघर जिल्ह्यात प्रथमच बेसबॉल प्रशिक्षण उपक्रम
विद्यार्थ्यांचा एमएलबी स्पर्धेत सहभाग
विरार, ता. १२ (बातमीदार) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या सहकार्याने राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, सफाळे येथे प्रथमच बेसबॉल या खेळाचे प्रशिक्षण शिबिर हे २० फेब्रुवारी ते ८ एप्रिल यादरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी बेसबॉल खेळाचे सर्व नियम व आवश्यक कौशल्ये उत्तम प्रकारे आत्मसात केली. या पार्श्वभूमीवर शाळेच्या ११ वर्षांखालील मुलांच्या दोन संघांची निवड करण्यात आली असून, हे संघ २४ एप्रिल २०२६ पासून अंधेरी येथे सुरू होणाऱ्या एमएलबी लीग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या प्रा. मधुमती कुलकर्णी, क्रीडा शिक्षक रमाकांत घरत, अनिल वझे यांच्या पुढाकाराने विद्यालयात बेसबॉल खेळाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण शिबिरात बेसबॉल प्रशिक्षक नितीन म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रितेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यात बेसबॉल खेळाच्या विकासाला चालना मिळणार असून, पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये या नवीन खेळाबद्दल आवड व कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.