सातिवलीतील जीवघेणा पाण्याचा कॉक हटवा

सातिवलीतील जीवघेणा पाण्याचा कॉक हटवा
Published on

पाण्याच्या कॉकमुळे अपघाताची भीती

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार परिसरातील सातिवली, मोरया नाका (स्मशानभूमी समोर) येथे रस्त्याच्या मध्यभागी पाण्याचा कॉक उघड्यावर व उंच स्थितीत ठेवण्यात आल्याने येथे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेच्या या हलगर्जीमुळे नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या वतीने पाणी सोडण्यासाठी या कॉकचा वापर करण्यात येतो, मात्र तो चक्क जमिनीच्या वर आल्याने दुचाकी, अथवा चारचाकी वाहनांच्या अपघाताची भीती वर्तविण्यात येत आहे. रात्रीच्या अंधारात हा कॉक तर दिसतही नाही. अशात येथील गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते देवीदास केंगार यांनी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यात संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हा पाण्याचा कॉक तत्काळ जमिनीच्या पातळीवर समतोल करावा किंवा त्यावर मजबूत व सुरक्षित झाकण बसवून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केंगार यांनी केली. अपघात घडण्यापूर्वीच प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अपघातास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही त्यांच्यावतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com