राज्यात ३५१ तालुक्यांमध्ये राबविणार स्पर्धा

राज्यात ३५१ तालुक्यांमध्ये राबविणार स्पर्धा
Published on

३५१ तालुक्यांमध्ये राबविणार पाणी फाउंडेशन स्पर्धा
मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः पाणी फाउंडेशनचा ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ हा शाश्वत आणि गटशेतीला प्रोत्साहन देणारा एक उपक्रम आहे. यंदा हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व ३५० तालुक्यांमध्ये राबवला जात आहे. या स्पर्धेत किमान ११ शेतकऱ्यांचा गट तयार करून स्मार्ट शेती ॲपद्वारे नोंदणी करावी लागते, याद्वारे हवामानपूरक शेती, जलसंधारण आणि गटशेतीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, गटशेतीला चालना देणे आणि शाश्वत शेती वाढवणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आणि कृषी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविला जातो. राज्यस्तरीय प्रथम बक्षीस २५ लाख रुपये असून, सर्वोत्कृष्ट महिला गट आणि इतर श्रेणींसाठीही विशेष पुरस्कार आहेत. ही स्पर्धा १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी निवासी प्रशिक्षण लोणेरे येथे आयोजित केल्या आहेत. तरी इच्छुक शेतकरी गट आणि शेतकऱ्यांनी संबंधित सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुरूड-जंजिरा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रमोद नारळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com