

ग्रंथदिंडीने २३व्या ‘साहित्य जल्लोष’ची सुरुवात
मराठी भाषेला स्थानिक बोलीभाषेची जोड द्यायला हवी : डॉ. दिलीप पांढरपट्टे
विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका (ग्रंथालय विभाग), ज्ञानदीप मंडळ, उत्तर वसईचे सेंट जोसेफ महाविद्यालय (सत्पाळा) आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वा साहित्य जल्लोषची सुरुवात मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व केशरी आंब्याच्या रोपाला पाणी देऊन वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. हे रोप महाविद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येणार आहे.
सत्पाळा नाका ते सेंट जोसेफ महाविद्यालय असा दिंडीचा मार्ग राहणार आहे. या दिंडीत वसई-विरार महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस व साहित्यिक मॅक्सवेल लोपिस यांचा सहभाग होता. पहिल्या सत्रात ज्येष्ठ गझलकार ॲड. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते साहित्य जल्लोषचे उद्घाटन झाले. या वेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, चित्रपट अभिनेते अरुण नलावडे, मधुकर भावे, कवी अरुण नलावडे, कवी अशोक नायगावकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड्रू कोलासो, अशोक मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदेश जाधव यांनी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या वेळी महापौर अजीव पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले, की वसईत साहित्य चळवळ अखंड सुरू राहणार आहे आणि त्या मागे आमची महापालिका ठाम उभी राहणार असल्याचा शब्द लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दिला आहे. वसईला मोथो साहित्य परंपरा आहे. वीणा गवाणकर ते अगदी प्रकाशक अशोक मुळे यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांनी येथील साहित्य समृद्ध केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी साहित्याचा जल्लोष हीच संकल्पना आवडल्याचे सांगितले. वसई-विरारमध्ये साहित्याची चळवळ सातत्याने सुरू असल्याने त्याचे कौतुक आहे. आपल्या सर्वसाधारण आयुष्यातही साहित्याला महत्त्व आहे. आज वाचन संस्कृती लोप पावत असतानाच्या काळात साहित्याच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोक जमतात, हेच आयोजकांचे यश आहे.
-------------
साहित्य जल्लोषचे उद्घाटक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, की वसईला साहित्याचा मोठा इतिहास आहे. आजच्या देशातील परिस्थितीवर बोलताना त्यांनी भाष्य केले, की सध्या देशात अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत; परंतु या ठिकाणाचा हा जल्लोष त्यात वेगळा आहे. साहित्य ही प्रेमाची परिभाषा आहे. यात द्वेष नाही. साध्या माणसांना घेऊन हा कार्यक्रम करणे, हे अप्रूप आहे. आजही साहित्य चळवळीला ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.