

महसूल सेवा थेट दारी
काचळीतील शिबिरात नागरिकांना दिलासा
पोयनाड, ता. १२ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे परिसरातील काचळी येथील समाजमंदिरात शुक्रवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ पार पडले. पोयनाड महसूल मंडळांतर्गत आयोजित या शिबिरात नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा तत्काळ निपटारा करण्यात आला.
शिबिरात उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेअर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच डिजिटल ७/१२, ८-अ उतारे देण्यात आले आणि जमीन नोंदीतील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. अकृषिक परवानगी, वर्ग-२ ते वर्ग-१ जमीन रूपांतरण, सनद प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. समाजकल्याण योजनांतर्गत घरकुल पट्टे व विविध अर्थसहाय्य योजनांची मंजुरी पत्रेही वितरित करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, राजा केणी, रसिका केणी, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
छायाचित्र :
पोयनाड : काचळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.