बालसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

बालसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
Published on

बालसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

कासा (बातमीदार) : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्यांतर्गत दिशा संस्था, अमरावती यांच्या समन्वयाने आश्रमशाळांमध्ये प्रभावी बाल संरक्षण प्रणाली उभारण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील कांबळगाव येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळेत ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेचे उद्‍घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणूचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्रीराम आंधळे, श्रीनाथ थोबाळे, डॉ. सायली जाधव, अजय राठोड, दीपक गवई, आदित्य वझुरकर तसेच वरिष्ठ लिपिक स्नेहल जगताप उपस्थित होते. दिशा संस्थेचे संचालक व तज्ज्ञ मार्गदर्शक ॲड. प्रवीण खांडपासोळे यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडत बाल संरक्षणाची संकल्पना, बालकांचे हक्क व जबाबदाऱ्या, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ तसेच पॉक्सो कायदा २०१२ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक माधुरी सोनावणे यांनी केले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शीला कुवरा, चैना गोलीम, योगिता धनू, ऋतिक ओझरे, कल्पेश वरठा, कमलेश्वर पागी, मंगेश गावंढा या आश्रमशाळा मोबिलायझर्सनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com