युरिया प्रकरणाचा उलगडा

युरिया प्रकरणाचा उलगडा
Published on

युरिया प्रकरणाचा उलगडा; ‘शेतीसाठीच’ वापर असल्याचे स्पष्ट

बोईसर, ता. १२ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या युरिया प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, जप्त करण्यात आलेला युरिया हा शेतीसाठीच वापरला जाणारा असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे.

२६ मार्च रोजी पोलिसांनी युरियाच्या गोण्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला होता. गोण्यांवर औद्योगिक वापराचा उल्लेख आढळल्याने काळाबाजाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तपासणीनंतर हा युरिया कृषी उपयोगाचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात वाहनमालक जितेंद्र नरेश पष्टे (रा. वाडा) याच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.
कृषी अधिकारी संदीप संखे यांनी सांगितले की, युरियाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. अहवालात तो शेतीसाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कागदपत्रांचा अभाव असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामागील संभाव्य काळाबाजार साखळीचा तपास पोलिस करत असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

----------------
नाशिकहून आलेल्या युरिया प्रकरणात तो शेतीसाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा युरिया नेमका कुठून आला व कोणासाठी मागवला याची सखोल चौकशी करून ४८ तासांत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा एमआयडीसी बोईसर पोलीस ठाण्यावर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल.
- अभिनय चौधरी, भूमीसेना आदिवासी एकता परिषद

----------------
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संबंधित युरिया हा शेती उपयोगी खत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वाहनचालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
- संदीप संखे, कृषी अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com