

खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका
बोईसर, ता. १२ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांनी वेग घेतला असला तरी अर्धवट सोडलेल्या कामांमुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पूर्ण न करता मध्येच काम थांबवण्यात आल्याने मोठे खड्डे पडले असून, हेच खड्डे आता अपघातांचे ‘सापळे’ ठरत आहेत.
दिवसा तरी हे खड्डे काही प्रमाणात दिसून येतात; मात्र रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अभाव आणि कोणतेही इशारा फलक नसल्याने वाहनचालकांना अचानक धक्का बसतो. परिणामी गाड्या आपटण्याचे प्रकार वाढले असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिक क्षेत्रात कामासाठी ये-जा करणारे हजारो कामगार व वाहनचालक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणांनी तत्काळ दखल घेऊन अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.