

दुचाकी चोरीतील सराईत चोरटा अटकेत
अल्पवयीन साथीदार ताब्यात, १० दुचाकी जप्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी दुचाकी चोरीतील सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल आठ गुन्ह्यांची उकल करीत १० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात दोन संशयित व्यक्ती उभ्या असलेल्या दुचाकींची पाहणी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ सापळा रचत घटनास्थळी धाव घेतली. या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
तपासात त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत पोलिसांनी शुभम ऊर्फ शिवम पठारे (२४) याला अटक केली. चौकशीत आरोपीने आपल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
या दोघांकडून विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक आणि उल्हासनगर परिसरातून चोरी करण्यात आलेल्या एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.