कोलाड येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन

कोलाड येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन
Published on

कोलाड येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन
रोहा, ता. १२ (बातमीदार) : कोलाड विभाग बौद्ध समाज, बहुजन समाज तसेच प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती यंदा भव्य आणि अनोख्या स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास डॉ. बाबासाहेबांचे वंशज अमनदादा आनंदराज आंबेडकर, मंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उद्योजक प्रमोद म्हसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जयंतीनिमित्त ‘माता रमाई सन्मान’अंतर्गत साडी वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, लघुपट प्रदर्शन तसेच समाजसेवकांचा सत्कार असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
समाजात सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भीम जयंती उत्सव समितीचे संदेश गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com