करंजाडे-चिंचपाडा येथे महसूल समाधान शिबिर

करंजाडे-चिंचपाडा येथे महसूल समाधान शिबिर
Published on

करंजाडे-चिंचपाडा येथे महसूल समाधान शिबिर
हजारोंना थेट लाभ
पनवेल ता. १२ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील करंजाडे-चिंचपाडा येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले असून, हजारो नागरिकांनी या उपक्रमाचा थेट लाभ घेतला. ओवळे मंडळाच्या वतीने काळभैरव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता.
या कार्यक्रमास आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त कोकण रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, अप्पर आयुक्त वैशाली इंदाणी, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मीनल भोसले-भामरे, नायब तहसीलदार राजश्री जोगी यांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये शेतकऱ्यांना ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत लाभ देण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांसाठी पेन्शन सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, डोमासाईल, उत्पन्न प्रमाणपत्र तत्काळ देण्यात आले. आधार कार्ड अपडेट सेवा आणि मतदार मॅपिंगही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
आमदार महेश बालदी यांनी अतिक्रमण नियमितीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले, तर रुबल अग्रवाल यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पनवेल ‘तिसरी मुंबई’ म्हणून विकसित होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सदाशिव वास्कर, रंजना वास्कर, मंगेश शेलार, सोनाली जितेकर, मनीषा जितेकर, रुपेश गायकवाड, समाधान घोपरकर, गणेश कडू, दर्शना भोईर, रत्नप्रभा घरत, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट
‘शासन आपल्या दारी’ची अंमलबजावणी
या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मिळाल्या. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि दिव्यांग घटकांना थेट लाभ मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, भविष्यात अशा शिबिरांची गरज अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com