खारघरमध्ये वृक्षतोडीविरोधात ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम

खारघरमध्ये वृक्षतोडीविरोधात ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम
Published on

खारघरमध्ये वृक्षतोडीविरोधात ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम
स्वच्छ फाउंडेशनकडून उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खारघर, ता. १२ (बातमीदार) : खारघरमधील वाढत्या वृक्षतोडीच्या विरोधात स्वच्छ फाउंडेशनने सुरू केलेल्या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिडकोकडून उत्सव चौक ते मेट्रो स्थानकादरम्यान उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी सुमारे १२७ झाडांची तोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात सिडकोने नागरिकांकडून हरकती मागवल्या असून, उद्यान विभागाकडे २६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, स्वच्छ फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगल कांबळे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन मोहिमेत आतापर्यंत ५०० हून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.
कांबळे यांनी सांगितले की, शहरी विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. झाडे ही केवळ हरित सौंदर्य नव्हे, तर शुद्ध हवा आणि मानसिक आरोग्यासाठीही अत्यावश्यक आहेत. या वृक्षतोडीला पर्याय शोधावा, अशी मागणी करण्यात येत असून, लवकरच सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com