महिलेची फसवणूक करणारा अटकेत

महिलेची फसवणूक करणारा अटकेत
Published on

महिलेची फसवणूक करणारा अटकेत
केळवेतील प्रकार; समाजमाध्यमाद्वारे खोट्या नावाने ओळख

पालघर, ता. १२ ः सफाळेतील एका महिलेशी समाजमाध्यमाद्वारे खोट्या नावाने ओळख करून तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच महिन्यांत लैंगिक शोषणासह या महिलेकडून अडीच ते तीन लाख रुपये या आरोपीने आणि त्याच्या पत्नीने ब्लॅकमेलिंग करून उकळले आहेत. महिला आणि आरोपी दोघेही विवाहित आहेत. केळवे सागरी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्याला रविवारी अटक केली आहे.
फसवणूक झालेली ३२ वर्षीय महिला आपल्या वडिलांकडे राहत होती. काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमावरील एका खात्यावर या महिलेची अजय म्हस्के या व्यक्तीची २०२५ मध्ये मैत्री झाली.
त्यानंतर त्याने या महिलेशी जवळीक साधत तो केळवे येथे आला. तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. यादरम्यान हा व्यक्ती या महिलेकडे वारंवार पैशांची मागणी करू लागला. मैत्री असल्याने या महिलेने पैसे दिले. या प्रकारामध्ये या व्यक्तीच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा संशय आहे.
आपल्यासोबत फसवणूक होत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. समाजमाध्यमावर ज्या नावाने या व्यक्तीने मैत्री केली आहे, ते त्याचे खरे नाव नसून दुसराच व्यक्ती असल्याचे प्रत्यक्षात या महिलेला समजले. आपल्यासोबत अन्याय होत असल्याची भावना या महिलेच्या मनात असल्याने तिने पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते मुकेश दुबे यांची भेट घेत त्यांना घडलेला प्रकार सांगितला. दुबे यांनी तिच्या मदतीसाठी पुढाकार घेत केळवे सागरी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
केळवे सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत महिलेची तक्रार दाखल करून घेतली. महिलेचा लैंगिक छळ आणि तिची फसवणूक करणारा राजू शेख याच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी गोस्वामी यांनी पथक तयार केले. याचदरम्यान शेख यांनी पुन्हा या महिलेकडे पैशांची मागणी केली होती. त्यानुसार या महिलेला पैसे घेऊन दादर येथे त्याने बोलावले होते; मात्र दादर येथे न येता पुणे येथे येण्याचे त्याने तिला सांगितले. त्यानुसार पीडित महिलेने पोलिसांसह पुणे गाठले. पुणे बस स्थानकाजवळ आरोपी राजू शेख पैसे घेण्यासाठी आला असता सापळा रचलेल्या केळवे पोलिसांनी राजू शेखला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. सद्यस्थितीत शेख हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी पालघर न्यायालयात केल्याचे अधिकारी गोस्वामी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com