एसआयआर मोहिमेतून अचूक मतदार यादीचा निर्धार

एसआयआर मोहिमेतून अचूक मतदार यादीचा निर्धार
Published on

५० लाख घुसखोर वगळण्याचा आग्रह
एसआयआर मोहिमेबाबत किरीट सोमय्या यांची माहिती
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून सुमारे ५० लाख बेकायदा बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, की एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट तसेच अपात्र नोंदींची छाननी करून ती वगळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रक्रियेद्वारे सुमारे ९० लाख घुसखोरांची नावे यादीतून कमी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. खारघर तसेच आसपासच्या परिसरात बेकायदा घुसखोरी झाल्याची शक्यता व्यक्त करीत या भागाची पाहणी करण्यात येणार असून, मुंब्रा-कळवा परिसरातही अशा घुसखोरांचा शोध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, की भारताशी मूळ संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्यास ती वगळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्यात २० एप्रिलपासून एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार असून, या प्रक्रियेमुळे अपात्र मतदारांची नावे वगळली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com