

ठाणे, ता. १२ : कळवा परिसरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई करत एका महिला दलालाला अटक केली. या कारवाईत दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रेती बंदर सर्कलजवळील हॉटेल अमित गार्डन येथे देहविक्रीसाठी मुलींना आणण्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार शुक्रवारी (ता. १०) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अटक केलेल्या महिला दलालाला न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या दोन्ही पीडित मुलींना उल्हासनगर-५ येथील शांतीसदन सुरक्षा गृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.