

गावठी दारूची वाहतूक करणारे दोघे जेरबंद
कर्जत, ता. १२ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, नेरळ पोलिसांनी शेलू चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. रविवारी (ता. १२) केलेल्या या कारवाईत ३१५ लिटर गावठी दारू आणि पिकअप टेम्पो असा एकूण तीन लाख ५८ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेलू येथील आंतरजिल्हा सीमेवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वांगणीकडून नेरळकडे येणाऱ्या पिकअप टेम्पोला थांबवण्यात आले. सुरुवातीला चालकाने टेम्पो रिकामा असल्याचे सांगून वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून टेम्पो नेरळ पोलिस ठाण्यासमोर अडवला. तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये गावठी दारूने भरलेल्या नऊ रबरी ट्यूब आढळून आल्या. प्रत्येक ट्यूबमध्ये ३५ लिटरप्रमाणे एकूण ३१५ लिटर दारू जप्त करण्यात आली. यासोबतच सुमारे तीन लाख ५८ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
यामध्ये शकील शेख (वय २१) व योगेश वायले (वय ३४) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईसाठी रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कर्जत विभागाचे नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी राहुल वरोटे यांनीही या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवले होते. पुढील तपास नेरळ पोलिस ठाणे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.