विश्व यादव संघाकडून सामाजिक एकात्मतेचा संदेश

विश्व यादव संघाकडून सामाजिक एकात्मतेचा संदेश
Published on

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण देशाचे नेते आहेत आणि त्यांच्या विचारांचा लाभ प्रत्येक समाजघटकाने घ्यायला हवा, अशी भूमिका यादव समाजाचे आर. एन. यादव यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि विश्व यादव संघाने यंदा प्रथमच डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विश्व यादव संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आज समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचू लागल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी डॉ. आंबेडकर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते आहेत, असा गैरसमज अनेक ठिकाणी आढळत होता. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने बौद्ध समाज व दलित संघटनांपुरते मर्यादित राहात होते. मात्र, बदलत्या सामाजिक जाणिवांमुळे आता इतर समाजघटकांमध्येही डॉ. आंबेडकरांविषयी जागरूकता वाढताना दिसत आहे. त्यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा स्वीकार सर्व स्तरातून होऊ लागला आहे.

या उपक्रमांतर्गत उद्या (ता. १३) दुपारी ३ वाजता सीवुड्स रेल्वे स्थानकजवळील बिहार भवन येथे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असणार आहे.

विश्व यादव संघाच्या या उपक्रमामुळे समाजात एकात्मता आणि समरसतेचा संदेश देणारा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संघटनेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com