

नवी मुंबई थोडक्यात
महापालिकेत आदर्श गाव/विभाग स्पर्धेचा प्रस्ताव
नेरूळ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ‘आदर्श गाव/आदर्श विभाग’ स्पर्धा राबविण्याचा प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी मांडला आहे. याबाबत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन दिले. शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वाहतूक शिस्त आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम, पायाभूत सुविधा आणि कर भरणा या निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे. विजेत्यांना पारितोषिके व विशेष निधी देण्याचा प्रस्ताव असून, यामुळे नागरिकांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढून शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
-----------------------------------------------
महात्मा फुले यांना अभिवादन
नेरूळ (बातमीदार) : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. महापौर सुजाता पाटील उपस्थित होत्या. उपमहापौर दशरथ भगत यांचीही उपस्थिती होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमापूजन करून आदर व्यक्त केला.
-----------------------------------------------------------
नेरूळ पदपथ दुरुस्तीचा निर्णय
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानकासमोरील सेक्टर २० परिसरातील नादुरुस्त पदपथामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. जनाराम रेसिडेन्सी ते गुडविल दरम्यानचा पदपथ खराब झाल्याने अनेकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. महापालिकेने दखल घेत गटार दुरुस्ती, पदपथ पुनर्बांधणी व संरक्षक ग्रील बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ३० लाख खर्चाच्या या कामामुळे सहा महिन्यांत नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे.
-----------------------------------------------
पोर्टा केबिन लोकार्पणाची मागणी
नेरूळ, ता. १२ : नवी मुंबईतील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या ‘पोर्टा केबिन’चे लोकार्पण करण्याची मागणी युवासेनेचे निखिल मांडवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले. शहरात २० हून अधिक ठिकाणी पोर्टा केबिन उभारण्यात आले असून, त्यांचा नागरिकांना उपयोग व्हावा, असे त्यांनी सांगितले. लोकार्पण लवकर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.