आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
Published on

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त बदलापुरात झालेल्या रक्तदान व आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७०७ व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, रायगड हॉस्पिटल (कर्जत) आणि अनिल आय हॉस्पिटल (बदलापूर) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतही नागरिकांनी रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत ३० ते ३२ बाटल्या संकलित करण्यात आले. याशिवाय हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजीसह विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ अनेकांनी घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले. नेत्र तपासणी शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तपासणीत काही नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी अल्प दरात सुविधा देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिबिराला बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी उपक्रमाचे कौतुक करत, आंबेडकर जयंती समाजोपयोगी कार्यातून साजरी करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com