

साकाई देवीचा गुरुवारी जत्रोत्सव
उमेळे गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
वसई, ता. १३ (बातमीदार)ः उमेळे येथील श्री साकाई देवीचा जत्रोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने गुरुवारी (ता. १६) सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविक साकाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळ भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गुरुवारी सकाळी देवीचा पालखी सोहळा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळ अध्यक्ष प्रवीण शांताराम वर्तक यांनी केले आहे.
--------------------
अनेकांची कुलस्वामिनी
श्री साकाई देवी चौसष्ट योगिनीपैकी एक देवता आहे. साकाई देवी १९२० मध्ये उमेळे येथील सोपार खाडीत प्रकट झाली. उमेळे गावातील भक्ताला दिल्याची आख्यायिका आहे. साकाई देवी भक्तांची कुलस्वामिनी आहे.