

भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद
खारघर (बातमीदार) : भारती विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने माईंड्स ही दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत २०५ संशोधक, व्यावसायिकांनी ८५ संशोधनपर निबंध सादर केले.
नवी मुंबई येथील भारती विद्यापीठ येथील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संयोजक डॉ. मोना सिन्हा यांच्या हस्ते झाले. या वेळी मोना यांनी आजच्या अनिश्चित व्यावसायिक वातावरणात लवचिकता आणि अनुकूल नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले, तर ऑस्ट्रेलियाच्या सदर्न क्रॉस विद्यापीठच्या प्रा.दर्शना सेडेरा यांनी ‘अराजकता सिद्धांत’ या विषयावर माहिती दिली. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचा सहभाग लाभला. यामध्ये श्रीलंका किवू विद्यापीठच्या कुलगुरू डॉ. सजीवानी अरच्ची, एक्सट्रॅक्ट टेक ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ल्यूक ग्रासियास, विप्रोचे कार्यकारी संचालक संजय राय यांचा समावेश होता.