

दिव्यांगांचा ३९व्या स्नेहमेळाव्याचे आयोजन
विरार, ता. १३ (बातमीदार) : उमेळे येथील दिव्यांग सेवा संस्था व रमेदीचे आयझॅक न्यूटन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसई तालुक्यातील दिव्यांगांचा वार्षिक स्नेहमेळावा रविवारी (ता. १९) आयझॅक न्यूटन ग्लोबल विद्यालय, रमेदी, वसई (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदा या स्नेहमेळाव्याचे ३९वे वर्ष आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात सुमारे ३०० दिव्यांग दिवसभराच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमणार आहेत.
या मेळाव्यात सुहृदांच्या गळाभेटी, सर्वधर्मीय प्रार्थना, स्पोर्ट्स, सहभोजन, करमणूक, विविध स्पर्धा, बक्षीस समारंभ, पुरस्कार आणि शेवटी एक जाहीर सभा, असा भरगच्च कार्यक्रम आहे. जाहीर सभेचे अध्यक्षस्थान आयझॅक न्यूटन विद्यालयाचे सर्वेसर्वा शिबू नायर हे भूषविणार आहेत, तर रमेदी चर्चचे पॅरिश प्रीस्ट फादर एरिक आल्फॉन्सो व लेखक बावतीस पेडीकर हे प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत असतील. गायिका लारिसा आल्मेडा आपल्या स्वागतगीताने सर्वांचे स्वागत करतील. कार्यक्रमाचे यजमानपद भूषविणाऱ्या आयझॅक न्यूटन विद्यालयाच्या प्राचार्या सोफिया डियाब्रियो स्वागत पर भाषण करतील व फादर मायकल जी. दिव्यांगांना सक्षम बनविण्याऱ्या स्नेहमेळावाचे भवितव्य अधोरेखित करणार आहेत.
यंदाच्या जिद्द पुरस्काराच्या मानकरी स्मार्ट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सर्विस सर्वेसर्वा एंजल फुल्या ठरल्या आहेत. त्याबरोबर वसईतील अनेक विशेष दिव्यांगसेवकांना सन्मानित केले जाणार आहे. दिव्यांगांना सन्मानित करण्यासाठी वसईचे फुटबॉलपटू सावियो डिसोजा, तसेच कलावंत प्रशांत लोपेस हजर असतील. या मेळाव्याची सूचना आपल्या संपर्कातील दिव्यांग व्यक्तींना द्यावी, असे आवाहन दिव्यांग सेवा संस्थेच्या संचालिका सिंथिया बॅप्टिस्टा व सल्लगार फादर मायकल जी. यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.