तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती

तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती
Published on

तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती
गुणवंतांना मिळाले नवे बळ
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे महाविद्यालयातील ज्युनियर व सीनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकूण सात विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये अक्सा मुकादम, इमान मापकर, इफात मापकर, जीविका नलावडे, प्राची सारदळ, रितेश देसाई, सौरभी उफाळे अशा एकूण ज्युनियर कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२,५०० रुपये आणि सीनियर कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०,८४५ रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज, रोहा यांच्याकडून दरवर्षी ‘सुधा सितारा’ या नावाने रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृत्तीचा वितरण समारंभ रोहा येथील डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृहात पार पडला. या वेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल, रोहा नगर परिषदेच्या अध्यक्षा वनश्री शेडगे तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या ग्लोबल प्रमुख शिवलिका राजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष राजीव साबळे यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com