

देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही : डॉ. रागिणी नायक
रोहा, ता. १३ (बातमीदार) ः जनतेला अच्छे दिनाचे खोटे आश्वासने देऊन भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली. वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल, पेट्रोल आणि जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत देशाला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात संघटन सृजन अभियान सुरू केले आहे. या संदर्भात रोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शिका डॉ. रागिणी नायक यांचे रोहे शहर अध्यक्ष मितेश कल्याणी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी व्यासपीठावर काँग्रेस जिल्हा कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावंकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर, निखिल ढवळे, तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख, रोहे शहर अध्यक्ष मितेश कल्याणी, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, युवा कार्यकर्ते आदिल पानसरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बिलाल कुरेशी, नजीर सय्यद इत्यादी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
रोहा ः काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.