

ज्येष्ठ शिवसैनिक रागिणी खामकर यांचे निधन
वसई (बातमीदार) : शिवसेनेचे शहरप्रमुख व ओमकार सार्वजनिक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष प्रणब खामकर यांच्या मातोश्री व ज्येष्ठ शिवसैनिक रागिणी रमाकांत खामकर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी रविवारी (ता. १२) अल्पशा आजाराने नालासोपारा येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा समाधान निवास समेळ पाडा येथून काढण्यात आली. या वेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू व दोन मुली असा परिवार आहे.