महात्मा फुले व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यपुरुष

महात्मा फुले व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यपुरुष
Published on

महात्मा फुले व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य पुरुष
संशोधक तेजस हरड यांचे प्रतिपादन

वाडा, ता. १३ (बातमीदार) : हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि परंपरांविरोधात तसेच ब्राह्मणी व्यवस्थेमुळे येथील स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्रांना माणूसपणाचे जिनेही नाकारले होते. त्याविरोधात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी जो लढा उभारला, त्याने समाजात जो बदल घडून आला त्याचे आपण सारे लाभार्थी आहोत. मात्र सद्य:स्थितीत बहुजन समाजापुढे नव्याने जी आव्हाने उभी राहिली आहेत, ते पाहता फुल्यांचे विचार किती कालसापेक्ष आणि कालातीत आहेत याची जाणीव होते. फुले हे पहिले असे समाजसुधारक आहेत ज्यांनी सर्व प्रकाराची आव्हाने पेलून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक चिकित्सा करीत समाजाला परिवर्तनाच्या दिशेला नेले. त्यामुळे फुले हे येथील व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य पुरुषच आहेत, असे मत अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील संशोधक तेजस हरड यांनी वाड्यात व्यक्त केले.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या प्रारंभानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने वाड्यातील पी. जे. विद्यालयाच्या सभागृहात महात्मा फुले यांची १९९वी जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून हरड हे दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नीलेश गंधे, वाड्याच्या नगराध्यक्ष रीमा गंधे, नगरसेवक भारतीताई सपाटे, सुचिता पाटील, प्रगती वलटे, सिद्धी भोपतराव, पातकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खैरकर, युवराज ठाकरे, नंदा बोरकर आदी उपस्थित होते. या वेळी अधिक मार्गदर्शन करताना आज समाजात वाढणाऱ्या अंधश्रद्धा, धर्मा-धर्मातील, जाती-जातीतील तणाव याबाबत फुल्यांनी मांडलेला सत्यशोधक विचार अत्यंत महत्त्वाचा असून, त्यांनी एकाचवेळी शिक्षणापासून, शेती, धर्मचिकित्सा, स्त्रियांच्या प्रश्नांवर विविध प्रकारचे लेखन अशा पातळ्यांवर काम करून समाजाला क्रांतिकारी विचार दिला, असे प्रतिपादन हरड यांनी केले.

दुसरे वक्ते समाज अभ्यासक चिन्मय पाटील यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची साखळी राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अण्णा भाऊ साठे, जेधे-जवळकरांपर्यंत येते. आपण आज जे संविधानाच्या माध्यमातून सन्मानाचे-प्रतिष्ठेचे जीवन जगतोय ते केवळ या परिवर्तनाच्या विचाराच्या वारशामुळेच शक्य होऊ शकले अन्यथा हा समाज वर्णवर्चस्वाच्या ओझ्याखाली पिचला असता. जाती-जातीच्या भिंती तशाच राहून समाज मागासच राहिला असता. त्यामुळे बहुजन समाजाच्या जीवनात फुल्यांचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा जागर कायम चालू ठेवण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र पालवे यांनी केले, तर आभार वैभव पालवे मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश बागुल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com