वाढवण महामार्गात ७२ हजार झाडांवर कुऱ्हाड,

वाढवण महामार्गात ७२ हजार झाडांवर कुऱ्हाड,
Published on

वाढवणसाठी पर्यावरणाचा बळी
७२ हजार झाडांवर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमी नाराज
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १३ ः वाढवण बंदराला जोडणाऱ्या हरित महामार्गासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील तब्बल ७२,७९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.
डहाणू, पालघर तालुक्यातील २४४ हेक्टरच्या जवळपासची जमीन वाढवणमुळे बाधित होणार आहे. ५,२१४ नागरिकांची बांधकामे अधिग्रहित होणार आहेत. वाढवण ते मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तवा येथे जोडल्या जाणाऱ्या या महामार्गासाठी २,३६० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे, तर महामार्गाचे कंत्राट जे. कुमार इन्फ्रा-शिंदे डेव्हलोपर्स या कंपनीला देण्यात आले आहे, पण या महामार्गासाठी केवळ दोन पट मोबदला दिला गेल्याने बाधित शेतकरी, नागरिक यांच्यात खदखद असून, नुकसानभरपाईला घेऊन दुजाभाव झाल्याची भावना आहे.
-----------------------
व्यावसायिक मार्ग
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. मात्र, हा मार्ग केवळ कंटेनर, कार्गो हाताळणी करणाऱ्या अवजड वाहनांसाठी नियंत्रण अणार आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या नावाखाली ‘राष्ट्रीय महामार्ग अधिनियम अंतर्गत’ जमिनी अधिग्रहित करत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग हा शब्द वापरून व्यावसायिक मार्ग उभारत असल्याचा आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समितीने केला आहेत.
-----------------------
पर्यावरणाची हानी
ग्रीनफील्ड महामार्गाच्या नावाखाली तब्बल ७२ हजार झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. पर्यायी वनीकरण, झाडांचा मोबदला देण्यात येत असला तरी सध्यःस्थितीत ऑक्सिजन देणारी झाडे नष्ट होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी अटळ असल्याने पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
-------------------
पालकमंत्र्यांची डोळेझाक
जिल्ह्यात विकासविषयक प्रकल्प उभारत असताना स्थानिक नागरिक, भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले होते. मात्र, वाढवण महामार्गाच्या मोबदल्यात वाढीव मागणीकडे दुर्लक्षाचा आरोप शेतकरी, सामाजिक संघटनांनी केला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
पालकमंत्री गणेश नाईक हे केवळ बोलतात. मात्र, करत काही नाही. वाढवण महामार्गाच्या मोबदल्यासाठी बाधितांचा संघर्ष सुरू असताना स्थानिकांची बाजू घेणारे पालकमंत्री आता कुठे आहेत.?
- हरेश वावरे, वाढवण प्रकल्पपीडित व बाधित शेतकरी संघर्ष समिती
-------------------
महामार्गात बाधित होणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरण. त्याबाबतची संख्या याबाबत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अधिकची माहिती देऊ शकतील.
- तेजस चव्हाण, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन
-
या प्रकल्पामुळे केवळ झाडेच नाहीत, तर शेकडो कुटुंबांची घरे, जलस्रोत कायमचे नष्ट होतील. हा महामार्ग बांधण्याचा ७३ हजार झाडांची कत्तल केल्यावर होणारी पर्यावरणाची हानी कधीही भरून येणारी नाही.
- वैभव वझे, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com