

मैदानी खेळाकडे वळा, तंदुरुस्त राहा
प्रकाश रॉड्रिग्ज यांचे तरुणाईला आवाहन
वसई ता. १३ (बातमीदार) : आज मोबाईल नेटच्या गराड्यात तरुणाई अडकत आहे, मात्र शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळाकडे वळले पाहिजे; जेणेकरून आपल्याला एकाग्रता प्राप्त होते आणि खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळते तसेच यातून तंदुरुस्त राहण्याची ऊर्जा प्राप्त होते, असे आवाहन यंग मेन्स कॅथोलिक असोसिएशन अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश रॉड्रिग्ज यांनी आयोजित फुटबॉल स्पर्धेत तरुणांना केले.
वसई पश्चिम माणिकपूर यंग मेन्स कॅथोलिक असोसिएशनने माणिकपूर मैदानावर फुटबॉल क्लबच्या सहकार्याने माणिकपूर परिषदेतील ख्रिस्ती बांधवांसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण १४ संघांमधील सुमारे १८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. १३ वयोगटाखाली व खुला गट अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा पार पडली. दोन्ही गटांमध्ये खेळाडूंनी चुरशीची लढत दिली आणि स्पर्धा रंगतदार केली. या स्पर्धेत १३ वयोगटाखालील स्पर्धेत फ्लॉयड गोन्साल्विस याने उत्कृष्ट गोलरक्षक, ॲड्रियन डीमेलो याने सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वाधिक गोल, तर खुल्या गटात रॉयसन अल्मेडाने सर्वाधिक गोल, कालुराम थापा याला सर्वोत्तम खेळाडू, रॉस गोन्साल्विसला उदयोन्मुख खेळाडू, रायन अल्मेडाला उत्कृष्ट गोलरक्षक हा मान मिळाला. तसेच चांगल्या कामगिरीबद्दल रायन अल्मेडा व प्रिन्सली अल्मेडा यांना पारितोषिके देण्यात आली. ॲड्रियन डीमेलो यांचा माणिकपूर विजार्डस् संघ विजेता ठरला, तर क्रेग मेनेझेस यांचा माणिकपूर ड्रॅगन्स संघ उपविजेता ठरला. रायन अल्मेडा यांचा माणिकपूर अवेंजर्स संघ विजेता, तर लेनॉक्स गोन्साल्विस यांचा माणिकपूर शार्क्स संघ उपविजेता ठरला, अशी माहिती ॲलिस्टर कोलासो यांनी दिली. सर्व विजेत्यांचे यंग मेन्स कॅथोलिक असोसिएशन अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश रॉड्रिग्ज यांनी कौतुक केले.
--------------
वसई : नगरसेवक प्रकाश रॉड्रिग्ज यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.