

खारघरमध्ये ३डी प्रदर्शनातून थोर व्यक्तींचा जीवनप्रवास उलगडला
तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाचा समाजप्रबोधन उपक्रम; खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक
खारघर, ता. १३ (बातमीदार) : खारघर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाने ‘सन्मान ते मुक्ती : एका क्रांतीची वाटचाल’ या विषयावर भव्य ३डी मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ११ ते १९ एप्रिलदरम्यान घरकुल शेजारील मैदानावर सुरू असलेल्या या प्रदर्शनाला खासदार वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, अण्णा भाऊ साठे, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती ऐकण्याची सुविधा देण्यात आली आहे.
तरुणांनी पुढाकार घेऊन समाजप्रबोधनासाठी केलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.