ठाण्यात मोबाईल चोरीच्‍या घटनांचे सत्र

ठाण्यात मोबाईल चोरीच्‍या घटनांचे सत्र
Published on

ठाण्यात मोबाईल चोरीच्‍या घटनांचे सत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांत वाढ होत असून, माजिवडा व घोडबंदर रोड परिसरात सलग दोन दिवसांत घडलेल्या दोन घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांत धूम स्टाइलने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले. दोन्ही घटनेत एक लाखांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.
पहिली घटना ११ एप्रिल रोजी रात्री साकेत कट, माजिवडा येथे घडली. डोंबिवली येथील जितेश कांचन हे खरेदी करून रिक्षाने घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून येत त्यांच्या हातातील ८० हजार रुपये किमतीचा आयफोन १७ प्रो मॅक्स हिसकावून भिवंडीच्या दिशेने पळ काढला, तर दुसरी घटना १२ एप्रिल रोजी घोडबंदर रोडवरील हावरे सिटी परिसरात घडली. आकाश जोशी हे हॉटेलमधून जेवण करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांचा २० हजार रुपये किमतीचा गुगल पिक्सेल ७ ऐ मोबाईल हिसकावून कापूरबावडीच्या दिशेने पलायन केले. या दोन्ही घटनांप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com