

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता वृद्धी, मेडिको-लीगल बाबींची अचूक हाताळणी आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रीत करत ठाणे जिल्हा रुग्णालयात नुकतेच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजात उपयुक्त ठरणारे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी ही कार्यशाळा घेतली होती. या वेळी आरोग्य उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शोभना चव्हाण यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी, पुरावे संकलनाची शास्त्रीय पद्धत आणि रुग्णांशी संवेदनशीलतेने वागण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी ‘टीबी मुक्त भारत’ अभियान आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक दिशा व सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेला आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहुड यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.