

डोंबिवली, ता. १३ : डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तिसरीतील कौस्तुभ सत्यवान गावकर याने राज्यात ७४ वा क्रमांक मिळवला. सहावीतील अजिंक्य अविन मंडलिक याने १५८ वा क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. याशिवाय, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सहावीतील भूषण समीर सक्रे याने रौप्यपदक व सन्मानपत्र मिळवून विशेष कामगिरी केली. विज्ञान क्षेत्रातील त्याची ही यशस्वी झेप शाळेसाठी अभिमानाची ठरली आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक सुरेश नारोळे यांचे नेतृत्व लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेसह पालकवर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.