

जिल्ह्यात मोकाट श्वानांची दहशत कायम
जानेवारी ते डिसेंबरदरम्यान तब्बल १९ हजार २४२ जणांना चावा
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भटक्या श्वानांची दहशत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षभरात तब्बल १९ हजार २४२ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. श्वानदंशाचे प्रमाण वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
श्वानदंशाचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
ग्रामीण भागात राखणदार श्वान, तर शहरी भागात मोकाट श्वानांची दहशत कायम आहे.
मोकाट श्वानांच्या दहशतीने शहरी भागासह ग्रामीण भागात रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण झाले आहे. रात्रपाळी संपवून येणाऱ्या कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हे श्वान पाच ते सहा जणांच्या टोळीने येतात व दुचाकीस्वारांवर हल्ला करतात. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षभरात तब्बल १९ हजार २४२ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नारिकांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारले
अलिबाग शहरात नुकतेच नगरपालिकेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. अद्ययावत उभारण्यात आलेल्या या केंद्रात शहरांमध्ये असणाऱ्या मोकाट श्वानांना कॅचिंग वाहनांच्या सहाय्याने पकडून आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याकरिता आवश्यक साधने उपलब्ध करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर मोकाट श्वानांना शेल्टर होमची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
ॲन्टी रेबिज व्हॅक्सिन उपलब्ध
सद्यःस्थितीत श्वानदंशावर उपचार करण्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ॲन्टी रेबिज व्हॅक्सिनचे तीन हजार ९८३ इंजेक्शन तर ॲन्टी रेबिज सिरमचे ६६९ इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. शितल जोशी यांनी दिली. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही डाॅ. शितल जोशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.