सानपाड्यात स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर

सानपाड्यात स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर
Published on

सानपाड्यात स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर
उपाययोजनांसाठी प्रशासनाला निर्देश
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबईतील सानपाडा गावठाण परिसरात स्वच्छता, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या कचरा वाहनांना प्रवेश मिळत नसल्याने कचरा संकलनात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी काही भागांत अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अंतर्गत रस्त्यांसाठी छोट्या तीनचाकी कचरा संकलन वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
सानपाडा येथील रहिवासी नीलेश कचरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात परिसरातील विविध समस्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग ही समस्या अधिकच तीव्र होत आहे. अरुंद रस्त्यांवर वाहनांची अनियंत्रित पार्किंग होत असल्याने वाहतूक ठप्प होते. यावर उपाय म्हणून संपूर्ण ट्राफिक ऑडिट करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नो-पार्किंग झोनची काटेकोर अंमलबजावणी, सम-विषम पार्किंग प्रणाली आणि रस्त्यांची नियोजनबद्ध पुनर्रचना करण्याचेही सुचविण्यात आले आहे. आपत्कालीन सेवांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.
याशिवाय सानपाडा पोलिस ठाण्याचे स्थलांतर पाम बीच येथे झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांची उपस्थिती कमी झाल्याने चोरीसारख्या घटनांत वाढ झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे सेक्टर ८ येथे पोलिस चौकी सुरू ठेवावी आणि गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट
कचरा व्यवस्थापनाची अडचण :
सानपाडा गावठाणातील अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या कचरा गाड्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचून राहतो आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनतो. छोट्या तीनचाकी कचरा संकलन वाहनांची संख्या वाढविल्यास अंतर्गत भागात नियमित कचरा उचल होऊ शकते आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल.
बॉक्स
वाहतूक कोंडी व सुरक्षा प्रश्न :
बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यांची अरुंदता यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचता येत नसल्याने धोका वाढतो. ट्राफिक ऑडिट, नो-पार्किंगची अंमलबजावणी, सम-विषम पार्किंग आणि ‘आपत्कालीन मार्ग’ निश्चित केल्यास वाहतूक सुलभ होऊन नागरिकांची सुरक्षितता वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com