अवैध वीज वापरात वाढ

अवैध वीज वापरात वाढ
Published on

कळवा, ता. १३ (बातमीदार) : शीळ-मुंब्रा-कळवा परिसरात वाढत्या अवैध वीज जोडण्यांमुळे केवळ कायद्याचे उल्लंघनच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार होणारे शॉर्टसर्किट, आग लागण्याचा धोका आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यावर अवैध वीज वापर कधी थांबणार? असा सवाल जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मार्च २०२० पासून महावितरणच्या फ्रँचायझी म्हणून टोरेंट पॉवर कंपनीने या भागातील वीज वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. वीज वितरण जाळ्याचे सुदृढीकरण, कायदेशीर जोडण्या आणि वीजचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी काही भागांमध्ये अवैध वापर सुरू आहे. मुंब्रा परिसरातील देवरीपाडा, राशिद कम्पाउंड, जीवन बाग, अमृतनगर, अमीनाबाद आदी भागांमध्ये अवैध ‘हुकिंग’ व नेटवर्कशी छेडछाड होत असल्याने वीजवाहिन्यांवर ताण वाढत आहे. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढला आहे. याचा फटका नियमित बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांनाही बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, नेटवर्क देखभाल व अवैध जोडण्या हटविण्याच्या कारवाईदरम्यान काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना विरोध होत असल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. वेळेत देखभाल न झाल्यास आगामी उन्हाळ्यात दीर्घकाळ वीज खंडित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन
टोरेंट पॉवरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी नागरिकांना आवाहन करत, अवैध जोडण्यांना पाठबळ न देणे, देखभाल कामांमध्ये सहकार्य करणे आणि केवळ कायदेशीर व मीटरयुक्त वीज वापरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सुरक्षित व स्थिर वीजपुरवठ्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com