

ठाणे (बातमीदार) : ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प १५ एप्रिलला कळवा येथील मनीषा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सभागृहात रंगणार आहे. दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत होणारा हा कार्यक्रम ‘वन्यजीव - निसर्ग - साहस’ या विषयावर आधारित असून, केवळ व्याख्यान न राहता एक अनोखी अनुभव यात्रा ठरणार आहे. कार्यक्रमात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन, थेट टॉक शो, साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा बहुरंगी उपक्रमांचा समावेश आहे. शैलेंद्र पाटील वनभटकंती व निसर्ग छायाचित्रणाविषयी अनुभव मांडतील, तर प्रदीप साळवी ग्रामीण युवाशक्ती व संवर्धनावर भाष्य करतील. उपवनसंरक्षक सचिन रेपाळे वन कायद्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, निसर्गप्रेमींसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.