हिरानंदानीत गृहिणीला सायबर गंडा

हिरानंदानीत गृहिणीला सायबर गंडा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : कासारवडवली परिसरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी असलेल्या हिरानंदानी इस्टेट येथील एका ६२ वर्षीय गृहिणीला व्हॉट्सॲपवरील शेअर मार्केट गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवण्यात आले. या घटनेत तब्बल ९४ लाख ६१ हजार ६९५ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आली आहे.
तक्रारदार अंशु बासवाणी यांच्या मोबाईलवर २७ जानेवारीला शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात एक जाहिरात आली होती. त्यावर क्लिक करताच त्यांना ‘५ पैसा मार्केट कॉम्पस झे६८६’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये ‘शालिनी कुलकर्णी’ नावाने ओळख करून देणाऱ्या महिलेने विविध शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवत मार्गदर्शन केले. यानंतर ‘गौरव’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून एका बनावट ॲपचे डाउनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपच्या माध्यमातून संबंधितांनी पीडित महिलेकडून वैयक्तिक तसेच बँकिंग माहिती मिळवली. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम भरून घेण्यात आली. शेअर्स व आयपीओच्या नावाखाली तब्बल ९४.६१ लाखांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणे शहर सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com